Ad will apear here
Next
‘देव आठवावा अशी स्थिती ओढवलेली नाही ही देवाचीच कृपा!’
मी फारसा श्रद्धाळू नाही. पण श्रद्धाळूंच्या भावनांचा प्रामाणिक आदर करतो. कारण स्वत:स नास्तिक, अश्रद्ध वगैरे अभिमानाने म्हणविणाऱ्यांच्या मनातदेखील कुठेतरी अशाच कसल्याशा भावनांचा ओला कोपरा अस्तित्वात असतो आणि एखाद्या हळव्या क्षणी त्या कोपऱ्याचा कप्पा उघडतो, हे मी अनुभवलेले आहे. त्यामुळे नास्तिकतेवर श्रद्धा ठेवून त्यानुसार आचरण करणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदर आहे.

मध्यंतरी, जेव्हा अंधश्रद्धांच्या विरोधातील चळवळ काहीशी जोरात होती, तेव्हा, अशा प्रसंगात नेमकी कोणाची बाजू घ्यायची या संभ्रमात राजकीय नेते सापडले होते. कारण अशा प्रश्नांवर भूमिका घेताना लोकांच्या भावनांचा विचार करावाच लागतो. ती राजकीय अपरिहार्यता असते. म्हणूनच, ‘गणपती दूध पितो’ अशी आवई उठली तेव्हा, ‘आमचा गणपतीही दूध प्याला’ असे तत्परतेने सांगून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आवईलाही अधिकृत करून टाकले होते, तर तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मात्र ही आवई झुरळासारखी झटकून टाकली होती. त्या त्या वेळी त्यांनी घेतलेल्या दोन्ही भूमिकांमागील वास्तव मात्र ‘लोकभावना जपणे’ हेच होते.
अशाच काळात, आणखी एका ‘राज’कीय नेत्याने अंधश्रद्धेच्या विरोधात भूमिका घेतली. नवग्रहांचे अंगठे, गंडेदोरे, अंगारेधुपारे ही अंधश्रद्धा असून ती झुगारली पाहिजे असे सांगत या नेत्याने आपल्या बोटांतील ‘ग्रहांच्या’ अंगठ्या समुद्रात ‘विसर्जित’ केल्या होत्या. त्या काढून ‘फेकून’ दिल्या नव्हत्या, हे विशेष होते.

तर, श्रद्धा, आस्तिकता हा बऱ्याचदा ‘भूमिका’ म्हणून जाहीरपणे मांडण्याचा मुद्दा असल्याने, कल बघून त्या मांडणे असाच अनेकदा कल असतो, असे वारंवार दिसले आहे. लोकांना कोणती भूमिका पटेल याचा विचार करून तशी भूमिका घेणे अनेक राजकारणी नेते श्रेयस्कर मानू लागले तेव्हाच मंदिर-मस्जिदचे मुद्दे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले होते.

आता राजकारणाने काहीशी कलाटणी घेतली आहे. तेव्हा ज्यांना लोकांच्या श्रद्धेच्या राजकारणात ‘राम’ वाटत होता, त्यांना आता मात्र तेव्हा ती चूकच होती असे वाटू लागले आहे. ‘ती कामगिरी आमची असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे’ असे उजळपणे सांगणाऱ्यांच्या अनुयायांना, ‘संकटकाळी देवांनी देवळातून पळ काढला’ अशी भाषा करणे ही गरज ठरू लागली.

त्यावर प्रतिक्रिया उमटल्या. समाजाच्या भावनांचा मुद्दा असल्याने, चावडीचावडीवर, पारावर, अंगणात, ओटीवर आणि, माजघरातही त्याचे पडसाद उमटत आहेत.

अशीच एक प्रतिक्रिया कानावर आली. बोलकी वाटली. ‘देव आठवावा अशी स्थिती ओढवलेली नाही ही देवाचीच कृपा!’

- दिनेश गुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZLHCK
Similar Posts
रिक्षा आणि सरकार! सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात; पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे
आई! ‘शेतकऱ्याचा प्रश्न हा असाच प्रश्न आहे. ते आपलं बाळ आहे असं समजून, आईच्या मायेनं त्याला संकटातून जपत बाहेर काढलं पाहिजे. त्यात राजकारण झालं, तर अगोदरच समस्यांचे तडाखे सोसणारा शेतकरी अधिक घायाळ होईल...’
आई! आई... तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहत होते. आम्हालाही वापर.. म्हणत! पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं. आज, या क्षणालाही तसंच वाटतंय. पण तरीही ठरवलं
आशावाद आणि इच्छाशक्ती... देविदास राठोड हे पालघरजवळील मनोर येथील ५५ वर्षांचे गृहस्थ एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून काम करतात. पालघरहून मुंबईच्या केईएम इस्पितळात येणाऱ्या २५ डॉक्टरांना दररोज आणण्या-नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचे घर पालघरपासून सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्या दिवशी त्यांना पालघरला येण्यासाठी एकही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language